Product Details
या विज्ञानाच्या युगात आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपल्या शरीराची तहानेसारखी अगदी साधी मागणी पुरवण्यासाठीही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शीतपेयांवर अवलंबून असतो, पण निसर्गातील सर्वात अमूल्य असं जे पेय - पाणी- त्यापासून शरीराला वंचित ठेवतो. साहजिकच आपल्याला अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं. डोकेदुखी, संधिवात, दमा, मूत्रसंस्थेच्या तक्रारी, अशक्तपणा, उच्च रक्तदाब इत्यादी रोगाच्या मुळाकडे आपण दुर्लक्ष करतोे. प्रतिजैविकांमुळे आपल्याला तात्पुरता आराम पडतो, पण त्याबरोबरच नवीन दीर्घकालीन समस्यांची सुरुवात होते. दररोज बारा ते चौदा ग्लास पाणी प्यायल्यामुळे (सामान्य व्यक्तीसाठी) जुनाट व्याधींसहित कितीतरी आजारांवर कसे उपचार करता येतात ते ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे. ह्या पुस्तकात दिलेले नियम काळजीपूर्वक पाळून पाणी प्यायलं तर आपल्याला त्याचे परिणाम ४८ तासांत दिसून येतात हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. त्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी आत्तापासूनच त्यांची अंमलबजावणी करा.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8177665308 |
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types