Product Details
या संग्रहातल्या ‘एक दिवा विझताना’सारख्या कथा न आकळणारी गूढरहस्ये या सूत्राभोवती फिरतात. ‘चौथी खिडकी’ ही एक अफलातून विज्ञानकथा ‘काळ’ या संकल्पनेभोवती रचली आहे, तर ‘पोरखेळ’सारख्या कथेमधून मानवाचे नियतीच्या हातातले बाहुले असणे, हे सूत्र बाळाच्या बाहुल्यांशी खेळण्याच्या प्रतीकातून सूचित केले आहे. कलावंत आणि कला यांच्यातला तिढा मांडणारी ‘सुचेता चक्रपाणी आणि तिचा कोकिळकंठ’ ही कथा एक उत्कृष्ट पँâटसी ठरते; ती जादुई वास्तववादाची आठवण करून देते. संधिप्रकाशातल्या धूसर वातावरणात एखाद्या अरण्यात शिरावे, तसे मतकरी यांच्या कथा वाचताना वाटते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर प्रवास सुरू होतो. वाचकांना या अरण्यातल्या कळलेल्या, न कळलेल्या वाटांकडे नेण्यासाठी मतकरी कथनाचे वेगवेगळे घाट, निवेदनशैली यांचा वापर करतात. हा प्रवास विलक्षण आकर्षक असतोच; पण तो आत आत खोलातही नेतो.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184984699 |
No.Of.Pages
|
128 |
Shades / Types