Product Details
‘‘कुठलीही मानवी समस्या कधीही कायमची सुटू नये, हा जीवनाचा अलिखित नियमच आहे! आजच्या समस्या आपल्याला सुटल्यासारख्याच वाटतात, पण त्या सुटतात,त्या उद्याच्या समस्यांना जन्म देऊन...’’ ‘‘मानवी जीवन मूलत: द्वंदपूर्ण आहे. तिथे भावनेचे वासनेशी, विवेकाचे विचाराशी आणि क्षणभ्ांगुराचे चिरंतनाशी सतत युद्व चाललेले असते, हे कटू सत्य मी नाकारू शकत नाही. म्हणूनच उठल्यासुटल्या प्रार्थनेचा, ईश्वराचा आणि आत्मशक्तीचा जयघोष करणाया माणसांना भाजीभाकरीच्या आणि औषध पाण्याच्या चार गोष्टी सुनावणे आवश्यक आहे, हे मला मान्य आहे; पण मानवी जीवन हे जसे नुसत्या सद्गुणांनी फुलत नाही, तसे ते केवळ श्रीखंडपुरी खाऊन आणि अन्य शरीरसुखाने भोगून विकसित होत नाही. त्या मनात भौतिक आणि आत्मिक यांचे मूलत:च मिश्रण झालेले आहे. त्यातल्या एका भागाचा संकोच करुन दुसया भागाची अमर्याद वाढ करण्याने मनुष्याचे दु:ख कधीच कमी होणार नाही. त्याला शांतीही प्राप्त होणार नाही. शरीर आणि आत्मा,काव्य आणि तत्वज्ञान, स्वार्र्थ आणि परार्थ, भौतिक आणि आत्मिक यांची समतोल सांगड ही मानवी मनाची आणि जीवनाची आजची खरीखुरी गरज आहे.’’
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8171614345 |
No.Of.Pages
|
176 |
Shades / Types