Product Details
“`महाकवी, महानाटककार, महाशेक्सपियर महाचालू! तो म्हणतो, प्रेम प्रेम ते काय? ये तो बस नजर का धोखा है! तुम्ही म्हणा, प्रेम हृदयात असतं... शेक्सपियर म्हणतो, ते नजरेत असतं! कधी कोणाची नजर पडेल, जादू होईल आणि प्रेम जन्माला येईल, हे सांगता येत नाही तशीच त्या प्रेमाला कधी कुणाची नजर लागेल, ते पण आम्हाला नाही रे बाबा माहीत! सगळा मामला नजरेचा!असं आम्ही नाही म्हणत! खुद्द शेक्सपियर सगळ्या नाटककारांच्या बापाचा बाप त्याच्या टमिडसमर नाइट्स ड्रीम या नाटकात म्हणतो...`` शेक्सपियरच्या नाटकाची अद्भुतरम्यता, काव्यमयता न गमावता, त्यातील प्रेमाविषयीचे हे फटकळ तत्त्वज्ञान आत्मसात करून मतकरी ते आपल्या स्वत:च्या शौलीत मांडतात. आजच्या पात्रांच्या आधुनिक संवेदनांसह. शेक्सपियरच्या जगप्रसिद्ध सुखात्मिकेशी समांतर असे आधुनिक जग रचणारे टजादू तेरी नजरछ, व्यावसायिक रंगभूमीवर फार दिवसांनी पाहावयास मिळालेले एक प्रसन्न, रंगीतसंगीत आणि अर्थपूर्ण नाट्यानुभव ठरले आहे
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
817766798X |
No.Of.Pages
|
72 |
Shades / Types