Product Details
कै. अण्णासाहेब किर्लोस्कर ते वि. वा. शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेच्यांचा श्री. वि. स. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह आहे. मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला, त्याचा अस्पष्ट आलेख या वेच्यांतून सूचित होतो. आज नट, नाटककार आणि नाट्यगृहे या नाट्यकलेच्या वैभवाला आवश्यक असलेल्या तिन्ही घटकांचे एक प्रकारचे दुर्भिक्ष जाणवत आहे. ही प्रतिकूल परिस्थिती पालटेपर्यंत मराठी रंगभूमीला जुन्या वैभवावरच जगले पाहिजे. `रंगदेवता' या ग्रंथात वाचकांना या वैभवाचे, अंशत: का होईना, दर्शन घडेल आणि या वैभवाला कारणीभूत झालेल्या निवडक नाट्यकृतींच्या समग्र अभ्यासाला ते प्रवृत्त होतील. रंगदेवता
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8171616771 |
No.Of.Pages
|
128 |
Shades / Types