Product Details
उपमारूपकांप्रमाणे यादवांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागते. आणि मग ‘सपनं पडत्यात’ सारखी समर्थ कविता निर्माण होते. रानातल्या ढेकळांना पाय फुटून ती गुमान पाठमोरी होऊन चालू लागतात. त्यांनाही बैलाच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांसारखे डोळे फुटतात. त्यात एक कहाणी भरलेली असते. जिभा पुâटत नाहीत म्हणून बापडी ढेकळंही डोळे मिटून पाणी गाळतात. खडतर दारिद्र्याच्या अनुभवानेही यादवांची कविता जशी विखारलेली नाही, तशीच सामाजिकतेच्या सहेतुक वाटेने, खेड्यातील दैन्यदारिद्र्याचं दुखणं वेशीवर टांगण्यासाठीही ती जन्मलेली नाही. शेतमळ्यातील तरारून वर आलेल्या पिकाच्या रसरसत्या सौंदर्याप्रमाणेच, त्यात जगणाऱ्या, राबणाऱ्या माणसांच्या भावभावना, सुखदु:ख आणि त्याचं दारिद्र्य हेही सारं त्यांच्या अनुभवाचं अविभाज्य अंग आहे. म्हणून या छोटेखानी संग्रहातही ग्रामीण जीवनाचं एक अस्सल आणि सम्यक्दर्शन घडत आहे. –अनुराधा पोतदार
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8171612644 |
No.Of.Pages
|
120 |
Shades / Types