Product Details
३० जानेवारी १९४८ रोजी, नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताचे पितामह महात्मा गांधी यांचा एका हिंदू अतिरेक्याने वध केला़ त्यानंतरच्या काळात अनेक असत्य गोष्टी सत्य ठरवण्यात आल्या़ काही अर्धसत्यांचे वास्तविक हकिकतींमधे मिश्रण करून त्या गोष्टी पूर्ण सत्य म्हणून खपवण्यात आल्या़. ‘‘भारताच्या फाळणीस गांधीच जबाबदार होते,’’ ‘‘गांधींनी मुसलमानांना आसरा दिला आणि हिंदूंना वा-यावर सोडले,’’ ‘‘गांधींना ठार करणे हाच भारताला वाचवण्याचा एकमेव मार्ग होता़’’ गांधी हत्येचं समर्थन करण्यासाठी हिंदू अतिरेकी व गोडसेच्या अनुयायांकडून तेव्हा अशी अनेक विधाने केली गेली आणि आजही केली जातात़ सर्व काही हकिकत अत्यंत खरेपणाने मांडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे़ गांधीजींचे पणतू तुषार अरुण गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकात अनेक इतिहासकालीन नोंदी, गांधी खून खटल्याचा वृत्तान्त, बचाव पक्षाचे वकील आणि न्यायाधीशांनी लिहिलेली पुस्तके, वर्तमानपत्रातील अहवाल, अनेक जणांशी केलेली तोंडी चर्चा व तुषार गांधींनी लहानपणापासून घरी ऐकलेल्या हकिकती यांचा आधार घेण्यात आला आहे़. राजकीय हत्यांच्या आजवरच्या इतिहासात, कामकाजातील ढिसाळपणा, मानवी चुका आणि संपूर्ण बेपर्वाई दाखवूनही कामचुकार अव्यावसायिक अधिकारी वर्ग बिनधास्तपणे दोषारोपातून सुटल्याचे दुसरे उदाहरण नसेल़ हे पुस्तक गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या कारस्थानाच्या शोधाची कहाणी आहे़.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184981445 |
No.Of.Pages
|
820 |
Shades / Types