Product Details
गोरगरिबांच्या उद्धारासाठी झटणाऱ्या, आयुष्यभर चिंध्या पांघरणारा आणि पैचाही मोह नसलेल्या स्वच्छतेसाठी अविरत झटणाऱ्या संत गाडगेबाबा यांचे प्रा. द. ता. भोसले यांनी सांगितलेले हे चरित्र आहे. गाडगेबाबांनी समर्पित भावनेने समाजकार्य केले. कर्मकांडाचा त्याग करून समाजाला खऱ्या जीवनाकडे वळण्यास प्रवृत्त केले. देव मूर्तीत नसतो, मंदिरात नसतो, तो तीर्थाटनात भेटत नसतो. तो उपासनेत नसतो. तो गोरगरीब जनतेच्या रूपाने सर्वांसमोर उभा असतो. गाडगेबाबांनी अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी, कर्मकांडांचा निषेध, अंधश्रद्धेवर प्रहार, गोरक्षणाची कल्पना, कुष्ठरोग्यांना आधार, भुकेकंगालांना अन्नदान, ग्रामसफाईचा आग्रह धरला, श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कार केला. गाडगेबाबांच्या कार्याची महती सांगणारे हे अभ्यासपूर्ण लेखन आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
332 |
Shades / Types