Product Details
डॉ. नीतू मांडके यांच्या पत्नी डॉ. अलका मांडके यांनी त्यांच्या पतीसमवेत अनुभवलेल्या सहजीवनाची ही काहाणी आहे. डॉ. मांडके हे हृदयरोगतज्ज्ञ म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित होते. त्यांचं शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, पेशंटविषयी आस्था, समाजहिताची आच, कामाप्रती निष्ठा आणि तळमळ हे डॉ. अलका मांडके यांनी जवळून अनुभवलं होतं. डॉ. मांडके यांचं हे रूप पुस्तकातून समोर येतं. एक डॉक्टर आणि एक माणूस म्हणून त्यांचं दर्शन त्यातून होतं अनेक नामवंतांवर त्यांनी उपचार केले; मात्र सामान्यांसाठीही ते कायम झटले. हृदयरोगासंबंधी त्यांनी जागृती केली. सामन्यांवर, गरिबांवर उपचार करण्यासाठी एक हॉस्पिटल बांधायचं त्यांचं स्वप्न होत. त्यांचा पश्चात डॉ. अलका मांडके यांनी ते साकारलं.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
236 |
Shades / Types