Product Details
डबल बेल' हे पुस्तक शासकीय व्यवस्थेचा, प्रशासनातल्या कार्यपद्धतीचा मानवी चेहरा आपल्याला दाखवतं. जनतेच्या अडचणींबरोबरच आपल्या सहकाऱ्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शासनव्यवस्थेवरचा विश्र्वास जपला आहे. 'डबल बेल'मध्ये लेखिका श्रद्धा बेलसरे-खारकर यांनी आपल्या शासकीय कारकिर्दीतल्या अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांना उजाळा दिला आहे. एक प्रशासकीय महिला अधिकारी जराही न डगमगता, माणुसकीच्या नात्यातून आपल्या सहकाऱ्यांनाच विश्र्वासात घेऊन स्वतःलाही त्यांच्या बरोबरीनं कामात झोकून देत शासनव्यवस्थेत सर्व स्तरांवर एक आदर्श कसा निर्माण करू शकते, हे अनेक प्रसंगांमधून उलगडणारं हे पुस्तक आहे.
Additional Information
Publication
|
अमेय प्रकाशन |
ISBN
|
978-93-5080-039-3 |
No.Of.Pages
|
160 |
Shades / Types