Product Details
सर्वसामान्य माणसाला सत्यसाक्षात्कारापेक्षाही भ्रामक सुखकर्ता व दु:खहर्ता ईश्वरच हवा असतो. माणसाने केवळ सुखकर्त्या व दु:खहर्त्या ईश्वरालाच रिटायर करून भागणार नाही तर त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वातील ‘मी’ (इगो)लाच रिटायरकरून समाजाच्या आमूलाग्र परिवर्तनाची नांदी स्वत:पासून करणे आवश्यक असते. पण माणसामधला इगो विसर्जित होत नसतो, असा नास्तिकांचा दावा आहे. तर सुखकर्त्या व दु:खहर्त्या ईश्वराला स्वतःच्या स्वार्थाकरता रिटायर करण्यास आस्तीकांचा नकार आहे. सगुण, साकार ईश्वराला स्वतःच्या स्वार्थाकरता रिटायर करण्यास नकार देणारे आस्तिक जसे अंधश्रद्ध ठरतात, तसेच ‘इगो’ला रिटायर करण्यास नकार देणारे नास्तिक, अज्ञेयवादी देखील अंधश्रद्धच ठरतात.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
80 |
Shades / Types