मुलांबाबतचा हळुवार विचार गेल्या शतक-दोन शतकांत विकसित होत गेला आहे. एकूण मानवी कल्याणाच्या ओघात मुलांचे भले हा विषय येत गेला आणि तो केंद्रवर्ती झाला कारण मुले हेच कोणत्याही देशाचे व समाजाचे भविष्य असते! बालकल्याणाच्या विचारापासून बालहक्कपर्यंत जाऊन पोचलेल्या ह्या संकल्पनेचा विकास आणि ऊहापोह.