Product Details
चार दिवस जिवाची मुंबई करायला आलेल्या पाहुण्यांना या महानगरीची मनाजोगती सफर करण्यास उपयुक्त असे अफलातून पुस्तक लिहून सविता अमर यांनी मोलाचे काम केले आहे. मुंबईविषयक अत्याधुनिक व तपशीलवार माहितीने समृद्ध अशी पुस्तके मराठीत फारशी आढळणार नाहीत. महाराष्ट्राची राजधानी व मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या या अफाट शहराच्या बाबतीत मराठी भाषेतील ही कमतरता प्रस्तुत पुस्तकाने भरून काढण्यास जोमदार सुरुवात केली आहे. त्याबद्दल लेखिका सविता, ग्रंथाली प्रकाशन तसेच प्रकाशनास सहाय्य करणारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या सर्वांचे अभिनंदन केले पाहिजे. त्याचबरोबर नमूद करायला हवे, की हे पुस्तक जन्मापासून इथेच राहत असलेल्या अस्सल मुंबईकरांनी देखील अवश्य वाचण्यासारखे आहे. त्यांनाही आपण न पाहिलेल्या मुंबईची मुशाफिरी करण्याची स्फूर्ती येऊ शकेल. – अरुण साधू
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
ISBN
|
9789384475550 |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
241 |
Shades / Types