Product Details
अलीकडील काळात आपण नेहमी हा रोग अनुवांशिक आहे किंवा जेनेटीक इंजिनिअरिंग, डीएनए टेस्ट असे उल्लेख ऐकतो. पण हे जेनेटिक्स म्हणजे नक्की काय, याचा उलगडा डॉ. उज्वला दळवी यांच्या पुस्तकातून होतो. एखादी वैज्ञानिक संकल्पना सामन्यांपर्यंत पोहचवायचि असेल, तर क्लिष्ट भाषा टाळावी लागते. डॉ. दळवी यांनी सामान्य वाचकाला समजेल, अशा सुलभ भाषेत उदाहरणे देऊन जेनेटिक्सवरचर्चा केली आहे. पुस्तकातील आकृत्यांच्या साह्याने विषय समजणे अधिक सोपे होते. बुद्धिमान वाचकांच्या मुलभूत शंकांचे निरसनही त्यातून होते. पुस्तकात संदर्भसूची, संदर्भग्रंथ आणि शब्दावलीचा समावेशही केला आहे. त्यामुळे जिज्ञासूंना पुढील अभ्यासासाठी ते उपयुक्त ठरेल.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
228 |
Shades / Types