Product Details
बॉम्बे स्कूल म्हणजेच १८५७ मध्ये स्थापन झालेले सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट. एत्तद्देशीय कारागीरांच्या मुलांना आधुनिक जगात कला व कारागिरीचे नवे ज्ञान व तंत्रज्ञान शिकविण्याचा हेतू या कलाशिक्षण संस्थेची स्थापना करण्यामागे होता. मुंबईतील व्ही. टी. स्टेशन, सेलर्स होम, राजाबाई टॉवर, बॉम्बे हायकोर्ट, क्रॉफर्ड मार्केट आदी इमारतींच्या बांधणीत संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. ‘बॉम्बे स्कूल ‘ या कलापरंपरेत शिकलेले विद्यार्थी व शिक्षक कलावंत, कलाचळवळ यांचा आढावा सुहास बहुळकर यांनी ‘बॉम्बे स्कूल आठवणीतले, अनुभवलेले ‘मधून घेतला आहे. जलरंग व तैलरंग या माध्यमावर प्रभुत्व असलेले सावळाराम लक्ष्मण हळदणकर व गजानन सावळाराम हळदणकर यांच्या लेखापासून या कलाप्रवासाचा प्रारंभ होतो.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
283 |
Shades / Types