Product Details
माझी मी’ जगले! कोणताही निर्णय घ्यायचा तरी मी एकटीच होते.मुलांचा आजार, माझी बाळंतपणं-दुखणी यासंबंधी निर्णय घ्यायचा तर कुणाचीही मदत घेत नाही. शेवटी,’संततीनियमनाचे ऑपरेशन करा’ असे डॉक्टरांनी सुचवले तरी संमतीपतत्रावर पालक म्हणून सही करणारी माझी मीच. नोकरी केली, निभावली ती मी एकटीने; मुलांचे शिक्षण केले, त्यांना घडवले; तेही मी माझ्या जवाबदारीवर. लग्न झाल्यापासून मी माझे आर्थिक निर्णय केले, झोपड्या-घरे बदलली ती स्वतःच्या हिमतीवर. मग माझ्या आत्मकथनाचे नाव ‘माझी मी’ हेच असणार ना? दलित समाजातील यशोधारा गायकवाड यांनी स्वतःचे जीवन स्वतः घडवले, उच्च शिक्षण घेतले; शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात मदत केली. त्यांची स्वतःची मुले तर खूप खूप मोठी झाली. तरी त्यांना वाटते, मी एकटीच आहे! स्त्रीची व्यथावेदना व्यक्त करणारे एक समग्र आत्मकथन.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
241 |
Shades / Types