Product Details
स्वातंत्र्यपूर्व काळात विस्कळीत, असंघटित आणि अशिक्षित असलेल्या आपल्या समाजातील उणिवा दूर करणार्या व देशाला स्वातंत्र्याच्या दिशेने नेणार्या निवडक व्यक्तींची चरित्रं. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राप्रमाणेच अध्यात्म, साहित्य, विज्ञान या सर्व क्षेत्रांतील नामवंतांची ही चरित्रं शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याप्रमाणेच कोणाही जिज्ञासू वाचकाला प्रेरक ठरतील. या पुस्तकात राजा राममोहन रॉय, नाना शंकरशेट, ईश्वरचंद्र विद्यासागर, दयानंद सरस्वती, दादाभाई नौरोजी, महात्मा जोतीराव फुले, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, महादेव गोविंद रानडे, अॅनी बेझंट, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे, बिपिनचंद्र पाल, जगदीशचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, एम. विश्वेश्वरय्या, मादाम भिकाजी कामा, मदनमोहन मालवीय, स्वामी विवेकानंद, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, विठ्ठलभाई पटेल या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-188-1 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
238 |
Shades / Types