Product Details
कमला निंबकर शाळेचा प्रकाश हा एके काळचा शाळेचा कवी. सध्या संगणकक्षेत्रात काम करतो. लेखिकेने त्याला विचारलं, ''प्रकाश, तू हल्ली कविता का करत नाहीस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘पूर्वी मी कुठेही असलो, काहीही करत असलो, तरी डोक्यात कवितेचेच विचार असे. मी ओळींचा, चपखल शब्दांचा विचार करत असे. आज माझ्या डोक्यात संगणकाचे विचार असतात. अमुक एक गोष्ट करण्यासाठी काय करावे लागेल, तमुक कशाप्रकारे करता येईल हे माझ्या डोक्यात कायम घोळत असते.’’ म्हणजेच प्रकाशची सृजनशीलता लेखनावरून संगणकावर संक्रमित झाली... सृजनशीलता असणं ही कोणत्याही व्यक्तीची नैसर्गिक गरज आहे. ती विविध गोष्टींतून प्रकट होते. तिला कुठेच पायबंद घालू नये. शाळेत तर बिलकुल नाही, कारण सृजनशीलतेचा पाया तर तिथेच असतो. प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवन शाळेच्या मुलांनी केलेल्या लिखाणाचं हे संपादित पुस्तक तुम्हालाही तुमच्या मुलांच्या लेखनाकडे किंवा सृजनप्रक्रियेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतो.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-225-3 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
108 |
Shades / Types