या पुस्तकामध्ये मिलिंद मुळीक यांनी निसर्गातले रंग आणि त्याच्या विविध अवस्था कधी अॅबस्ट्रॅक्ट तर कधी सेमी-अॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने चितारल्या आहेत. ही पेंटिंग्स रँडम फ्लो आहेत. वेगवेगळे ब्रशस्ट्रोक्स, टोन्स आणि पॅचेस यांचे कॉम्बिनेशन आहेत. कधी हे स्ट्रोक्स हळुवारपणे एकमेकांवर येतात आणि त्यातून निसर्गातले रंग प्रतीत होऊ लागतात.