मिलिंद मुळीक यांनी जलरंगावरील या पुस्तकात ओळख, सराव, स्केचिंग, रचना, रंग, चित्रनिर्मिती आणि गॅलरी या प्रकरणांमधून जलरंगातील काम कसं करावं याची प्राथमिक तंत्रापासून ते सूक्ष्म बारकाव्यापर्यंत तपशीलवार व अनेक प्रात्यक्षिकांसह माहिती करून दिली आहे. या पुस्तकातील गॅलरीत येणारी त्यांची चित्रंही त्याबद्दलच्या विवेचनामुळे जलरंगातील अनेक बारकावे सांगून जातात.