Product Details
लिमन फ्रँक बाउम या लेखकाने ही ओझभूमी आणि त्यातील अवलिया व चित्रविचित्र पात्रे निर्माण केली आणि त्यांच्या अनेक गोष्टी रंगवल्या. त्यांवर त्याने एकूण तेरा कादंबर्या लिहिल्या. त्यांतील ‘दि वंडरफुल विझर्ड ऑफ ओझ’ ही पहिली आणि सगळ्यांत गाजलेली कादंबरी. एका चक्रीवादळात डोरोथीचे घर उडते आणि ती तिच्या कुत्र्यासह एका अज्ञात प्रदेशात जाऊन पोहोचते. तिला घरी जाण्यासाठी मदत करू शकेल अशी एकच व्यक्ती असते - ओझभूमीतला जादूगार. त्याच्यापर्यंत जाताना तिला अनेक मित्र भेटतात. शूरपणाच्या शोधात असणारा एक भितरा सिंह, बुद्धी हवी असणारे बुजगावणे आणि लोखंडाच्या शरीरात हृदयच नाही म्हणून हळहळणारा एक पत्र्याचा माणूस. या सार्यांच्या मदतीने अनेक संकटांवर मात करत तिचा प्रवास सुरु होतो... एखाद्या परीकथेत जे जे असायला हवे ते सगळे यात आहेच. पण अगदी वेगळ्या प्रकारची पात्रे, प्रसंग, संघर्ष यात पाहायला मिळतात आणि ते मुलांना काही छान धडेही शिकवतात.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-421-9 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
120 |
Shades / Types