उन्हाळ्याच्या सुट्टीत गीतांजली आपल्या चुलत भावांबरोबर कालागढच्या अभयारण्यात सहलीला जाते. हत्तींवर मनापासून माया करणार्या या गबदूल मुलीला तिचे भाऊ 'हत्तीण' म्हणून चिडवत असतात आणि योगायोगाने कालागढला त्यांना भेटतात हत्तीच. हत्तींच्या सहवासात त्यांची ही सफर खूपच चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक ठरते...!