Product Details
ह्या घरात राधा तर राहतेच; पण राधाचे आई-बाबा, झालंच तर नाना, आजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसले, तरी नेहमी राधाशी खेळायला येतात, म्हणून तेही ह्या घरातलेच आहेत. अशा ह्या घराच्या इवल्या इवल्या गोष्टी. आई - कधी कधी कुणी विचारतं, ‘‘राधे, तू कुणाची? आईची? की बाबाची? की आजीची?...’’ राधा म्हणते, ‘‘मी सगळ्यांची, पण आई फक्त माझी!!’’ बाबा - राधाचा बाबा दिवसभर घरात नसतो. पण घरी आला, की राधाशिवाय त्याला मिनिटभरही करमत नाही. काका - काका म्हणजे वाराच. सारखं इकडून भुर्रर्र, तिकडून भुर्रर्र! तो आपल्यापेक्षा मोठा आहे असं राधाला वाटतच नाही. n आजी - ‘‘मी तुझ्याएवढी होते नं, राधे ऽ...’’ आजी असं म्हणते तेव्हा राधा दोन्ही कान टवकारून अन् डोळे मोठ्ठे करून छोट्या आजीच्या गोष्टी ऐकते. भाऊ - राधाला सख्खं भावंड नाही. पण म्हणून काय झालं! तिचे शनिवार-रविवारचे भाऊ आहेत ना - गौतम आणि तन्मय! नाना - राधाचे आजोबा काही रोज कामाला जात नाहीत. घरातच असतात. त्यामुळे त्यांच्यापाशी राधासाठी केव्हाही आणि कितीही वेळ असतो.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-422-6 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
144 |
Shades / Types