Product Details
भाषा हा केवळ कथा-कादंबर्या-कविता लिहिणार्यांचा प्रांत नसून प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो. योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावं लागतं. भाषा मुळातच कच्ची राहिली तर कोणताही विषय नीट समजणं कठीण होतं, इतर भाषा शिकतानाही अडचणी येतात. लेखन सुधारण्यासाठी मुलांना उपयोग व्हावा आणि त्यांना मदत करणं मोठ्यांना सोपं जावं या उद्देशाने 'लिहावे नेटके' हा तीन पुस्तकांचा संच तयार केला आहे. यातला तिसरा भाग उत्तरांचा आहे. माधुरी पुरंदरे यांनी भाषाशास्त्रासारखा विषय रंजक पद्धतीने सोप्या शैलीत मांडला आहे. त्यांची विषय समजावून सांगण्याची पद्धत आणि त्यासाठी दिलेली उदाहरणं, लिहिण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणार्या पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून पुढच्या मुलांना ह्या पुस्तकांचा उपयोग होईलच, शिवाय इंग्रजी माध्यमात शिकणार्यांसाठीही आपली भाषा सुधारण्यासाठी या पुस्तकांचा चांगला उपयोग होईल.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-232-1 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
782 |
Shades / Types