शांताबाईंनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने विविध प्रांतातल्या, प्रदेशांमधल्या तसंच परदेशांमधल्या गोष्टी देशी पद्धतीने सांगितल्या आहेत. रसाळ व साध्या सोप्या भाषेमुळे या गोष्टी आपल्याशा वाटतात. पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. लहानांसोबत मोठ्यांनाही भुरळ घालतात.