Product Details
दि.म.संत यांचा पिंड अभ्यासकाचा नाही, कार्यकर्त्याचा आहे. परंतु त्यांना जीवन जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी, त्यांच्याकडे दोन गोष्टी आहेत. एक-त्यांचे दैनंदिन जीवन, त्यातील घडामोडी, त्यावरील प्रभाव… थोडक्यात जीवनानुभव. दुसरी गोष्ट म्हणजे त्या अनुभवाचा अर्थ लावण्यासाठी वाचनविचार व चिंतन. ते या दोन्ही गोष्टी कार्यकर्त्याच्या निष्ठेने करतात. त्यांच्या अनुभवाच्या मुशीतून तयार झालेल्या विचारचिंतनातून जे प्रकट होते ते मात्र वाचकाला विचारप्रवृत्त करणारे ठरते. असुरक्षितता, अस्वच्छता, आपत्ती यांनी पिडलेल्या आजच्या जगात संत यांचा ‘मुक्तीचा मार्ग’ मार्गदर्शक आहे असेच म्हणावे लागेल. त्यांनी सुचवले आहे त्याप्रमाणे ‘मी’चे (अहम् चे) भरणपोषण करणाऱ्या सर्व तऱ्हेच्या श्रद्धांपासून माणूस मुक्त होऊ शकला तर…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
64 |
Shades / Types