सईला गुलाबाचं फार वेड होतं. म्हणून माळीदादा तिला गमतीने गुलाबी सई म्हणत असत... तिला वाटायचं आपल्याप्रमाणेच झाडांनाही भूक लागते. म्हणून तिला मिळालेला खाऊ ती झाडांनादेखील द्यायची. तिला वाटायचं की झाडांना खूप आनंद होईल मग ती अधिक जोमाने वाढतील पण झालं उलटंच...