चंद्रसदन' नावाच्या नव्या इमारतीतील एक घर. त्या घरात केतकी, तिची आई आणि मावशीआजी राहतात. मावशीआजीला आपलं जुनं घर, जुना रस्ता, जुने शेजारी सारखे आठवतात. 'तेव्हा सगळं कसं छान होतं. आता काहीसुद्धा उरलं नाहीये,' अशी तिची तक्रार असते. पण या नव्या इमारतीतही नवे शेजारी आहेत. त्यांच्याशीही गट्टी करता येते. छोट्या केतकीला जमलंय ते...