Product Details
सावळकरांनी प्राथमिक शिक्षक म्हणून पहिली नियुक्ती लमाण तांड्यावर झाली. तांडयातील लोकांना स्वतःला राहण्यासाठी घरे नाहीत तर दुसऱ्याला कोठून देणार? सावळकर आंबेजोगाईसारख्या शहरात जन्मलेले जन्मलेले व शिकलेले. तांडा हा सावळकरांसाठी एक नवीन प्रकार होता. पण सावळकर या गोष्टींना घाबरले नाहीत. अशावेळी सावळकर जनावरांच्या गोठ्यात राहिले. एका बाजूला बकऱ्या एका बाजूला जनावरे, मध्येच सावळकरांनी संतरंजी अंथरलेली, डोक्यावर शेकारलेले छप्पर, सकाळी झोपेतून उठले की अंगाला बकऱ्यांच्या लेंड्या व जनावरांचे शेण चिकटलेले, कपड्याचा कुबट वास यायचा. पण सावळकरांनी या गोष्टीची कोठेही तक्रार केली नाही. परिस्थिती जुळवून घेण्याचा प्रयत्न सावळकरांनी केलेला आहे. प्रामाणिकपणा व सचोटी सोडली नाही. “पाण्यात राहून माश्याशी वैर नको” म्हणून त्यांनी तांड्यातील लोकांच्या सवयी नाईलाजास्तव अंगिकारल्या. त्या अंगिकारताना सावळकर कोठेही वाहवले नाहीत.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
190 |
Shades / Types