Product Details
शोषितांशी अजस्र धागा जुळलेला आहे माझा. ‘तसव्या’ म्हणजे घनघोर अंधारातली पायवाट. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीने महिलेला सर्वश्रेष्ठतत्वाची उपमा दिली, तिला पूजनीय स्थळी नेऊन ठेवले अन् पडद्याच्या आडून तिला अबला ठरवून तिचे कितीतरीपट शोषण केले. अन् तिच्या हाता-पायात कायम गुलामगिरीच्या बेड्या ठोकल्या. नव्या युगात महिला पुढे येत आहेत परंतु त्याचे प्रमाण किती टक्के आहे? --- चाबकाचे एकामागोमाग फटकारे मारीत अशोक पवार भारतीय समाजव्यवस्था, मानवी संस्कृती आणि मध्यमवर्गीय सुसंस्कृत समाजाची व्यवस्थेबाहेर हद्दपार केलेल्या समूहाकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी क्रूर, निबर संवेदनाहीन वृत्ती यावर प्रखर झोत टाकतात. ते प्रश्न विचारीत नाहीत, कि कैफियत मांडत नाहीत. ते फक्त भटक्या, विमुक्त अशा दुर्लक्षित, वंचित, शोषित समूहांबद्दल लिहितात. त्यांचे जीवन, माणसे. स्त्रिया, त्यांच्या कथा, त्यांची वणवण आणि केवळ जगण्यासाठी चाललेली विकल धडपड; आधुनिक भारतीय समाजाची माणुसकी किती ढोंगी, पोकळ आणि मतलबी आहे हे ते नकळत उघड करतात. नुसती गोष्ट सांगून. उत्स्फूर्त शब्दांमधे. भाषेला अलंकार चढविण्याची, कलाकुसरीची त्यांना गरज नाही. या भटक्या पद-दलितांमधील स्त्री ही अधिकच दलित, शोषित, अत्याचारित. अशा एका स्त्रीची कहाणी पवार यांनी प्रस्तुत ‘तसव्या’ या कादंबरीत रोखठोकपणे सांगितली आहे. ती वाचून मध्यमवर्गीय वाचकांना आपले तथाकथित नीतिमूल्यांचे जग भूकंपाच्या जबर हादर्याने पार डळमळून गेल्यासारखे होईल. ती स्त्री म्हणजे कादंबरीची नायिका गिरिजा. शिक्षणाची ओढ असलेली, निर्घृण अत्याचार सहन करीत आपला सन्मान (डिग्निटी) न सोडता आयुष्यात थोडे तरी ‘सुख’ पाहता यावे म्हणून नियतीशी झगडणारी. मराठी साहित्यातील लक्षणीय नायिकांमधे कधीतरी तिची गणना होईल अशी आशा आहे. -अरुण साधू, सुप्रसिद्ध कादंबरीकार
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-98-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
220 |
Shades / Types