Product Details
...ज्याच्या नजरेतून ही गोष्ट सांगितली आहे त्या मुलाचे नाव आहे मोहन. सतरा-अठरा वर्षाचा हा अनाथ मुलगा. कोकणातल्या एका गावातला. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणारा. एका आजारी मुलाचा, सुहासचा; ‘केअरटेकर’ म्हणून मुंबईला येतो. लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये सुहासबरोबर राहाताना त्याला भेटतात वेगवेगळ्या आजारांशी सामना देणारी मुले, त्यांचे कुटुंबीय. शिवाय हॉस्पिटलच्या जगातल्या अनेक व्यक्ती. आजवर, फक्त येणार्या चोवीस तासाच्या हिशोबाने जगण्याला अंगावर घेणार्या मोहनला ह्या वातावरणात जाण होते स्वत:मधल्या करुणेची, सेवाभावाची! आजार आणि आरोग्य, जीवन आणि मरण अशा टोकांमध्ये हेलकावणारे हॉस्पिटलचे दिनक्रम मोहन संवेदनशीलतेने टिपू लागतो. जगण्यावर प्रेम करणारी इच्छाशक्ती, स्वार्थापलीकडे जाणारी सहकार्याची भावना आणि नियतीच्या निरगाठी ह्या प्रवाहात मोहन कधी सहभागी होतो त्याचे त्यालाही कळत नाही. जशी मदत करणारी माणसे भेटतात तशी अडचणी उभ्या करणारी माणसेसुद्धा. हळूहळू वॉर्डातले छोटे, मोहनसाठी ‘माझी मुले’ बनून जातात. मोहनच्या जगण्याला एक निश्चित दिशा मिळते. मोहन, सुहास आणि मोहनच्या मुलांचा प्रवास सुरूच राहतो, वास्तवाचे भान ठेवून आणि मनातल्या स्वप्नांची जाण ठेवून. ही कहाणी घरातल्या सर्वांनी (शक्य झाल्यास एकत्र, मोठ्याने) वाचण्यासाठी आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-83850-01-3 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
132 |
Shades / Types