Product Details
माझी ही ‘फिरस्ती’ माणसाकडं झेपावणारी... माणसांच्या जगण्या-मरणाच्या लढाया बघणारी... या ‘फिरस्ती’तून अशी माणसं दिसली, की ज्यांचं जगणं केवळ कल्पनेच्या पलीकडचं आहे... या ‘फिरस्ती’त अशी माणसं दिसली की त्यांच्या स्पर्शातून शब्द जन्माला येतात... या ‘फिरस्ती’तून अशीही माणसं दिसली, की जी प्रत्येक श्वासासाठी एक महालढाई करतात... चार बहिर्या लेकींची आई असंल, रस्त्यावर जुन्या चपला शिवणारा शिक्षक असंल, आतडी भरण्यासाठी उंदीर, घुशी खाणारे लोक असतील किंवा परिस्थितीच्या मानगुटीवर बसून तिला आपल्या मनासारखं चालायला लावणारे असतील... हे सारे सारे माझ्या साहित्याचे नायक ठरले... ते न हरता लढत राहतात... जखमांतूनही सूर्याची पिल्ली जन्माला घालतात... खचलेल्याला उभारी देतात आणि आपल्या सार्या सार्या धडपडींना ‘जीवन ऐसे नाव’ म्हणतात... वाचकांना खेचून विचार करायला लावतात... विधायक बनवतात.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-94-7 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
184 |
Shades / Types