Product Details
डॉ. वासुदेव मुलाटे हे समकालीन लेखक. साधारणत: 1968-69 पासून मराठीमध्ये लेखकांची एक पिढी उदयाला आली. या पिढीतील बहुसंख्य लेखक असे होते की, ज्यांच्या घरात लेखनाची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. लेखनाचीच काय, शिक्षणाचीही पार्श्वभूमी नव्हती. हे सारेच लेखक हे पहिल्या पिढीचे लेखक होते. दारिद्य्राशी आणि जीवनातल्या अनेक प्रश्नांशी झगडत झगडतच ते जीवनामध्ये स्थिर होत होते. किंबहुना लेखन करणे हाच त्यांच्या जीवनातील सौख्याचा भाग होता. ते सारेच लेखक तेथे ‘व्यक्त होण्याचा’ अनुभव घेत होते. हेच त्यांचे बलस्थान होते. डॉ. मुलाटे यांनी संख्येने फार मोठ्या प्रमाणात नाही, पण लक्षणीय असे कथालेखन केले आहे. बदलत्या काळात माणसांची होणारी घुसमट, ग्रामीण माणसांचे होणारे शोषण, अधोविश्वातील सुखदु:खे त्यांनी मांडली आहेत. हे सगळे कथालेखन काहीसे उपेक्षित राहिले आहे. या उपेक्षेची कारणे कोणती वगैरे याची चर्चा येथे करण्याचे कारण नाही. निदान या ‘निवडक कथां’च्या निमित्ताने तरी त्यांची चर्चा व्हावी व त्यांनी मराठी कथेला दिलेल्या योगदानाची नोंद व्हावी अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
192 |
Shades / Types