Product Details
आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. तुलनेने आजच्या स्त्रियांना काळ अनुकूल आहे, तर पूर्वीच्या काळी मात्र स्त्रिया अतिशय प्रतिकूल अशा वातावरणात अपवादानेच आपले कर्तृत्व सिद्ध करत असत. स्त्रीसुद्धा पुरुषांएवढी किंबहुना त्यांच्यापेक्षाही कर्तबगार व पराक्रमी असू शकते, याची अनेक उदाहरणे इतिहासात ठायी ठायी दिसतात. राणी लक्ष्मीबाई, कित्तूर चन्नम्मा, जिजामाता, ताराबाई, चांदबीबी इत्यादी त्या सर्वांत वेगळ्या पद्धतीने उठून दिसणारी व्यक्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंच्या जीवनात एकामागून एक असे दु:खाचे अनेक डोंगर कोसळत होते. त्यांचे सर्व जीवन दु:खमय झालेले. ‘दु:ख कोणाला सांगावे? दु:ख देवाला सांगावे’, अशी त्यांची परिस्थिती होती. अहिल्याबाईंनी आपले प्रेम, वात्सल्य, माया, ममता आपल्या प्रजेला दिल्या. राज्यात शांतता व सुखसोयी निर्माण करून, प्रजेकरिता अनेकानेक कल्याणकारी कामे केली. दूरदर्शी अहिल्याबाईंनी राष्ट्रीय एकात्मता साधून अखंड भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-60-8 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
88 |
Shades / Types