Product Details
आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ थोडं वेगळं आहे. त्याच्या पायातल्या महत्त्वाच्या हाडांवाचून ते जन्माला आलंय असं त्यांना कळलं. ऑस्करच्या आईबाबांनी त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापण्याचा अवघड निर्णय घेतला... त्याला भविष्यात जास्तीतजास्त नॉर्मल जगता यावं यासाठी! त्याच्या आईनं त्याला एक पत्र लिहिलं होतं, त्यात ती म्हणते, ‘अंतिम रेषा सगळ्यात शेवटी पार करणारा हा खरा हारतो का? त्याला पराजित म्हणायचं का? नाही! जो कडेला बसून नुसता खेळ पाहातो, आणि खेळात, स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करायला धजत नाही तो खरा पराजित!’ ‘ड्रीमरनर’ म्हणजे पायांशिवाय ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहाणार्या असामान्य धावपटूची त्याच्याच स्मरणसाखळीतून उलगडत जाणारी जीवनकहाणी. जीवनाकडे पाहाण्याची योग्य मनोदृष्टी असेल तर अशक्य वाटणार्या गोष्टीही शक्य होऊ शकतात याया प्रत्यय देणारी, अविश्वसनीय, तरीही सत्यकथा! स्फूर्तीदायक! - द स्कॉटस्मन, फास्टेस्ट मॅन ऑन नो लेग्ज! - द टाईम्स, असामान्य! - फायनॅन्शियल टाईम्स.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-99-2 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
176 |
Shades / Types