Product Details
‘दिवास्वप्न’ प्रथम 1931 मध्ये गुजरातीत प्रकाशित झाले. हे पुस्तक अध्यापनशास्त्रातले जागतिक स्तरावरचे एक उत्तम व मूलभूत पुस्तक समजले जाते आणि गिजुभाईंना शिक्षण क्षेत्रातले एक विद्वान म्हणून सिद्ध करते. गिजुभाई बधेका (1885-1939), एक उच्चन्यायालयाचे वकील, आपल्या मुलाला वाढवण्यात समरस होऊन, त्या निमित्ताने मॉंटेसरी-शिक्षण पद्धतीच्या सखोल अभ्यासात गुंतले गेले. 1916 मध्ये त्यांनी भावनगर इथल्या दक्षिणामूर्ती बालमंदिरमध्ये आपले शैक्षणिक प्रयोग सुरू केले. त्यांनी बालकाधिष्ठित शिक्षणाचा पुरस्कार केला आणि ‘बालदेवो भव’ या घोषवाक्याला जन्म दिला, अर्थात् ‘बालकाची पूजा करा’ त्यांनी 200 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली, त्यापैकी जवळपास वीस पुस्तकं पालक आणि शिक्षकांसाठी आहेत.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-76-9 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
80 |
Shades / Types