Product Details
एकूण अपयश कशामुळे येते? वर्गात प्रत्यक्षात काय घडते? अपयशी होणारी ही मुलं काय करत असतात? त्यांच्या डोक्यात काय चाललेले असते? त्यांच्यातील क्षमतांचा ते अधिक वापर का करत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी केलेल्या संशोधनाचा या पुस्तकात चार भागांत आढावा घेण्यात आला आहे. ‘मुलांच्या युक्त्या’ यामधे शाळा आणि पालक यांच्या मुलांविषयीच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अथवा त्या टाळण्याचा मुलं कसा प्रयत्न करतात. ‘भीती व अपयशा’चा परस्परसंबंध व त्याचा मुलांच्या युक्त्या आणि शिक्षणावर होणारा परिणाम. ‘खरे शिक्षण’ या विभागात मुलांना काय समजले आहे आणि त्यांना खरोखर काय आकलन झालेले असते याची चर्चा. ‘शाळा अपयशी कशा होतात’ यात शाळा निरनिराळी चुकीची धोरणे कशी राबवितात याकडे या पुस्तकात लक्ष वेधले आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-90-5 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
216 |
Shades / Types