Product Details
‘पाणी...’ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक! पाण्याचा अभाव दुष्काळ म्हणजे जीवनव्यापी संकट! जीव पाणी पाणी करणारे! त्यावर मात करायला पाणीच हवे. सर्वसाधारण देशस्थितीचा अभ्यास केला तर हे पाणी दुर्मिळ नाही. पाऊस पुरेसा पडतो. फक्त तो आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका आणि हवा तेवढाच पडतो असे घडत नाही. त्यामुळे पडलेले पावसाचे पाणी अडविले नाही तर ते वाहून जाते आणि उरते ती फक्त पाणी टंचाई! ही टंचाई संपविणे आणि दुष्काळी स्थितीवर निदान काही अंशी तरी मात करणे शक्य आहे. व्यक्तीगत आणि ग्रामपातळीवर सामुहिकरित्या असे प्रयत्न केले तर फार मोठे यश मिळू शकते. हे पाणी कसे अडवावे? त्याच्या पद्धती कोणत्या? त्या किती परिणामकारक आहेत? असे प्रयत्न यापूर्वी कुणी केले आहेत का? त्याना कितपत यश मिळाले? त्यासाठी कुठून आर्थिक मदत मिळते? किती? कशी? त्यासाठी तुम्ही स्वत: काय करू शकता... ह्या सगळ्याचे निवेदन आणि विवेचन म्हणजेच हे पुस्तक. त्यानुसार करून तर पहा... दुष्काळ भेडसावणार नाही! अगदी निश्चित! आपल्या अभ्यासाने आणि आजवरच्या अनुभवाने हा दिलासा श्री. मुकुंद धाराशिवकरांनी ह्या ग्रंथाद्वारे आपणास दिला आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-40-0 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
240 |
Shades / Types