Product Details
‘नेमेचि येतो...’ हे विधान फक्त पावसाच्यापुरतेच तपासावयाचे झाले तर, दुष्काळालाही लागू होते. 6-7 वर्षांतून पुन्हा एकदा तोच कमी पाऊस... कमी पाणी... पिके जळणे... जनावरांचा चारा... घरगुती पाणी... सगळ्यांवरच संकट! इतकी वारंवारता असूनही आपल्याला त्यावर उपाय का सापडत नाही? काय केले तर हे उत्तर सापडेल? ते कसे करता येईल? प्रश्नच प्रश्न! एक प्रश्नांचे भेंडोळे! एक चक्रव्यूह! भेदलाच पाहिजे असा! अनेक विचारवंत, तज्ज्ञ, थोर समाजधुरीण तसेच प्रत्यक्ष कार्यातून यशाचा मार्ग दाखविणारे कृतीवीर ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही यशाची किरणशलाका शोधता येईल! अशा दशा-दशा झालेली पाण्याची स्थिती सुधरविण्याची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न! आपले ओंजळभर पाणी तुम्हीही ह्यासाठी वाचवू शकाल! ‘पाणी - उद्याची दिशा’ हे अशा विचार मंथनाचे नवनीत आहे. आजची दुर्दशा असली तरीही! जरुर घ्या. वाचा. कळवा. तुम्हालाही निश्चितच भावेल. आचरणात आणावेसे वाटेल. - संपादक
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-01-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
268 |
Shades / Types