Product Details
पुस्तक, पुस्तकांची निर्मिती आणि पुस्तकांची खरेदी या सगळ्या गोष्टींच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या संकल्पना फक्त 15 वर्षांच्या काळात पूर्णपणे बदलून टाकायची किमया जेफ बेझॉस या माणसानं करून दाखवली आहे. त्यानं सुरू केलेल्या ‘ऍमॅझॉन डॉट कॉम’ या वेब साईटनं आधी पुस्तकांचं वितरण, पुस्तकांची खरेदी या गोष्टींच्या संदर्भात प्रचंड धूमाकूळ घातला. इंटरनेटवरून पुस्तकांची विक्री करणं अशक्य असल्याचं मत व्यक्त होत असताना बेझॉसनं हा जगातल्या सगळ्यात जास्त नफा मिळवून देणार्या व्यवसायांपैकी एक होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता तर छापील पुस्तक, छापील वर्तमानपत्र, छापील नियतकालिक या गोष्टी इतिहासजमा करून या सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक म्हणजे डिजिटल आवृत्त्याच भविष्यात बघायला मिळतील, असं चित्र बेझॉसनं निर्माण केलं आहे. गटेनबर्गच्या छपाईयंत्राच्या शोधानंतर शब्दांचं भवितव्य एकहाती बदलून टाकणारा माणूस म्हणून आपण बेझॉसचं आणि त्याच्या ‘ऍमॅझॉन डॉट कॉम’चं वर्णन करू शकतो! ऍमॅझॉनच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतात : * पुस्तकांच्या विक्रीमध्ये इतकं यश मिळवण्यामागचं रहस्य काय असू शकतं? * पुस्तकांचं रंगरूप पूर्णपणे बदलून टाकण्याजोगं ऍमॅझॉननं नक्की काय केलं आहे? * ऍमॅझॉनचं किंडल हे उपकरण नक्की काय करतं? * अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत ऍमॅझॉनचं वादळ पोहोचेल का? आणि कसं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पुस्तकात मिळतील.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-66-4 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types