Product Details
पाण्याचा प्रश्न हा देश, धर्म, वंश, खंड, भाषा, लिंग, वय या सार्या भिन्नतेच्या पलीकडे आहे. त्यामुळेच त्याचा मुळापासून पुनर्विचार करून नव्याने मांडणी करावी लागणार आहे. ही नवी रचना लोकांना समजावून सांगावी लागणार आहे. त्यांना या विचारात व कृतीमध्ये सामावून घ्यावे लागणार आहे. ज्यांचा आदर्श प्रगत व विकसित म्हणून डोळ्यासमोर ठेवतात ते खरोखरच तसे आहेत का? आपण विकास विकास म्हणून कुरवाळतो तो खरा विकास आहे की विकासाचा मुखवटा धारण केलेला भस्मासुर आहे, हेही तपासावे लागणार आहे. ज्यांनी कोणी पर्यावरणाचे संरक्षण आणि शुद्ध पाणी देण्याचा वसा घेतला आहे, त्यांच्या परीक्षेचा हा क्षण आहे. जगातील विविध देश पाण्याबद्दल काय विचार करतात, काय कृती करतात, त्यातून काय कमावतात, काय गमावतात, काय करूच शकत नाहीत, ह्याचा चिकित्सक पद्धतीने, साक्षेपाने, मांडलेला आढावा म्हणजे ‘देशोदेशीचे पाणी’ जरूर वाचा. विचार आपोआपच कराल. कृतीसाठी सज्ज झालात तर खरे यश!
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-75-2 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
212 |
Shades / Types