Product Details
हे सगळं नाटक तसं चांगलं नाहीच, पण इलाज नाही. अभियानाचं नाटक चालूच हाये सार्या जिल्ह्यात. बरं, नाही करावं तर दुसरं नाटक उभं राहतं. म्हणजे नाटक आहेच. या नाटकात आपलं एक सोंग हाये. कलेक्टरपासून शाळीग्रामपर्यंत कितीतरी सोंग हायेत. अभियानाचं डफडं वाजत राहील तोपर्यंत सोंग नाचत राहतील. घातलेला मुखवटा हेच सोंगाचं जगणं. मुखवट्याखाली आपला एक खरा चेहरा हाये याची आठवण सोंगानं ठेवायची नाही. तशी आठवण येत राहीली की सोंग वठव नाही आणी सिंग वठलं नाही की चेहरा उघडा पडतो. चेहरा उघडा पडू नये म्हणून सोंग वठलं पाह्यजे. आपल्याला चेहरा नाही असं सोंगाले वाटलं पाह्यजे. मुखवटा हाच आपला चेहरा, इतकं त्याचं मुखवट्याशी नातं जुळलं पाह्यजे. कसं आणि केव्हा झालं – कळलं नाही, पण आपलं असंच झालं. आता, सोंगच जगणं झालं. महं-तुहं-त्याचं-तिचं. याहीचं-त्याहीचं. सार्या हीचं असंच झालं. सोंगच जगणं झालं… आपल्या सार्वजनिक जीवनातील एका फार्सच कादंबरी… विनोद, उपहास, उपरोध, विसंगती आणि अनेक गमतीजमती यांनी ओतप्रोत भरलेली.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
303 |
Shades / Types