Product Details
आपण सगळे इंटरनेट, इमेल, चॅटिंग वगैरे तंत्रज्ञान अगदी सहजपणे वापरत असलो तरी हे सगळं तंत्रज्ञान मुळात कुठून आलं याविषयी फारशी कल्पना नसते. यामागचा तांत्रिक भाग वगळूनसुद्धा त्यामधली ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी समजून घेणं खूपच मनोरंजक आहे. शीतयुद्धाच्या काळात जन्मलेल्या या अपूर्व तंत्रज्ञानानं विसाव्या शतकात जगच बदलून टाकलं. कुणी विचारसुद्धा करू शकणार नाही अशा प्रकारे इंटरनेटनं प्रचंड वेगानं संदेशवहन आणि संवाद यांच्यात क्रांती घडवून आणली. अलीकडच्या काळात तर पुस्तकं, माहिती/ज्ञान, बातम्या, खरेदी, अनेक प्रकारचे व्यवहार या सगळ्या गोष्टींचे निकषच बदलून टाकण्यात इंटरनेट यशस्वी ठरलं आहे. अशा या सनसनाटी प्रकारच्या तंत्रज्ञानाची अत्यंत रंजक आणि चित्तथरारक पार्श्वभूमी या पुस्तकात रेखाटलेली आहे. जिथे गरज असेल तिथे संबंधित तंत्रज्ञानाची थोड्या खोलात जाऊन ओळखसुद्धा करून देण्यात आली आहे. पण त्यामागचा मुख्य उद्देश सर्वसामान्य वाचकालाही हे तंत्रज्ञान भावेल, आवडेल, समजेल हा आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-87-5 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
212 |
Shades / Types