Product Details
धरणे नव्हती तेव्हाही वर्षभर पुरेल असे पाणी सांभाळले जातच होते. पायविहिरी, कप्पी, रहाट, घटीचक्र वापरून विहिरीतून उपसतच होते. शेती पिकतच होती. भारत हे जगातले सर्वात श्रीमंत राष्ट्र होते. अगदी ब्रिटिश राजवट स्थिरावेपर्यंत हीच स्थिती होती. आता मोठमोठी धरणे आली. वीज आली. परंतु पाण्याची टंचाई चिंताक्रांत करू लागली. अशावेळी एकच मार्ग! सर्व प्रश्नांचा पहिल्यापासूनच संपूर्ण विचार करणे! कारणमीमांसा शोधणे, उपायही शोधणे! कारणांचा विचार करताना लख्खकन् नजरेसमोर आल्या... आमच्या देशातल्या दोनशे पेक्षाही जास्त परंपरा! शतकानुशतके टिकलेल्या! आज धरणे असूनही पाणी नाही. तेव्हा धरण नसूनही पाणी होते. दोघांना एकत्रपणे वापरता आले तर...? जलअभ्यासक मुकुंद धाराशिवकर यांनी घेतलाय आढावा ‘‘पाण्याच्या भारतीय परंपरा’’ यांचा! तुम्हीही वाचा. विचार करा. आवडले आणि पटले तर अवश्य कृती करा. तुम्हाला शुभेच्छा!
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-77-6 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
184 |
Shades / Types