Product Details
काऊन्सेलिंगची गरज हे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन-तीन दशकांच अपत्य ! ती गरज असणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी ‘जाऊ की नको,’ ही अवस्था ओलांडण्यात वेळ वाया जातो. तरी बिचकत का होईना, आता लोक काऊन्सेलरकडे जातात. तसे माझ्याकडेही येत. या कादंबरीची नायिका माझ्याकडे आली नव्हती. पण… नायिकेची अस्वस्थ शेजारीण मला भेटायला आली. शेजारी राहणाऱ्या नवविवाहित दांपत्याबद्दल तिनं मला खूप काही सांगितलं. ती निंदा नव्हती. सामाजिक कर्तव्याचं भान असलेली ती शेजारणीला तीन-चार आठवड्यात पाहिलं नाही, वा तिचं बोलणं ऐकलं नाही,असं सांगून अस्वस्थ स्वरात म्हणाली, “नवरा तिला दटावत असल्याचं कानी येतं. तिचे दबले हुंदके ऐकू येतात, म्हणजे ती बाहेरगावी गेलेली नाही. एवढ्या माहितीच्या आधारे मीच त्या ‘नायिके’ कडे गेले आणि मग… लेखिकेसमोर एका भग्न आयुष्याचा मोठा पट उभा राहिला. लेखीकेमधील काऊन्सेलरने तो उध्वस्त झालेला संसार सावरला. त्याचीच ही कथा…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
212 |
Shades / Types