Product Details
भारतात 2596 बोलीभाषा अस्तित्वात आहेत! आश्चर्य वाटतं ना? हा आकडासुद्धा कमीच आहे; कारण भाषा विषयक संशोधन केंद्राने (Linguistic Survey of India - 2001) किमान 10,000 तरी भाषिक असलेल्या बोलींची नोंद केली आहे. यावरून भारतातील बोलीभाषांचा खजिना किती समृद्ध आहे याची कल्पना येईल! या सगळ्या भाषांमधल्या निवडक गोष्टींचा संग्रह करणे, हासुद्धा दशकानुदशके चालणार्या संशोधनाचा विषय होऊ शकेल. अशाच एका भाषाविषयक संशोधनातून जमा झाला ‘भारतीय भाषांमधील धम्माल गोष्टी’ हा संग्रह! चक्मा, लिंबू, लेप्चा, अंगामि’ ही मजेदार नावंही भारतातील बोली भाषांचीच आहेत बरं! या नवीन बोलींबरोबर मराठीसह आपल्या परिचयाच्या इतर भाषांमधीलसुद्धा धम्माल गोष्टी या संग्रहात एकत्र आल्या आहेत. - कृपा कुलकर्णी
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-15-2 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
142 |
Shades / Types