Product Details
‘‘आमचं आभाळ आम्हाला द्या - द्या आम्हाला धरती - आमचा समुद्र आम्हाला द्या - जसा तो पूर्वी होता आमचाच-’’ समुद्रातून उचलून मत्स्यालयात बंदिस्त ठेवलेल्या महाकाय कासवाची ही गोष्ट. स्वातंत्र्याची ऊर्मि त्याला स्वस्थ बसू देत नाही. ते मत्स्यालयातून युक्तीनं सुटका करून घेतं, सागरात परत येतं. पण त्याचा सागर आता पूर्वीसारखा जीवनदायी राहिलेला नाही. माणसानं तो प्रदूषित करून टाकला आहे. स्वकेंद्री वृत्तीमुळे मानवानं इतर प्राणीमात्रांचं स्वातंत्र्य नष्ट केलं. विध्वंसक प्रयोग करून निसर्गमातेवर अत्याचार केले. पण निसर्गाच्या नाशात त्याच्याही विनाशाची बीजं असल्याचं तो विसरला. कासवाच्या सुंदर समुद्रांत स्फोटक बॉम्ब पेरून ठेवणार्या माणसाला धडा शिकवण्यासाठी महाकाय कासव प्रचंड धडपड करतं. अखेरीस स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन तो बॉम्ब, वायर तोडून तो निकामी करतो आणि आपल्या पिल्लांसाठी, इतर प्राणीमात्रांसाठी निरामय घराची, आयुष्याची वाट दाखवून देतो. निसर्ग आमची माता - आमचं ते आवडतं घर - एक सूर, एक ताल गाणे आमचे आम्हाला द्या - आमचं घर आम्हाला द्या.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
--- |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
90 |
Shades / Types