Product Details
मी भक्ष किंवा बळी ठरण्याचं नाकारते - जॅकलिन गोल्ड जॅकलिन गोल्ड ही `अॅन समर्स`, या एका प्रचंड यशस्वी किरकोळ विक्री दुकानांच्या साखळीची धडाडीची मुख्य कार्यकारी अधिकारी- चीफ एक्झिक्युटिव्ह, आहे. `कॉस्मोपॉलिटन` मासिक आणि `डेली मेल` वृत्तपत्रानं ब्रिटनमधली सर्वांत प्रभावशाली स्त्रियांपैकी एक म्हणून तिची निवड केली आहे, आणि ब्रिटनमधल्या सर्वांत यशस्वी महिलांमध्ये तिची गणना होते. पण तिला हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. `अ वुमन्स करेज`मध्ये पहिल्यांदाच तिनं आपली संपूर्ण आणि अद्भुत कहाणी लोकांसमोर मांडली आहे. सावत्र वडिलांनी लहानपणी केलेल्या छळाचं- तेव्हापासून तिच्या मानगुटीवर बसलेलं भूत तिनं कसं उतरवलं, खरं प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात तिच्या आयुष्यामध्ये घडलेली आणि तिचं हृदय भग्न करणारी अनेक वादळी प्रेमप्रकरणं आणि मूल होण्यासाठी, आपलं स्वत:चं कुटुंब निर्माण करण्यासाठी तिनं गर्भनलिका प्रजनन (आय.व्ही.एफ.) तंत्र वापरण्याचे जे अयशस्वी प्रयत्न केले, त्यातून पदरी आलेली निराशा आणि दु:ख, हे सगळं तिनं मोकळेपणानं सांगितलं आहे. बार्बरा टेलर ब्रॅडफर्डच्या `अ वुमन ऑफ सबस्टन्स`शी साम्य साधणाNया आपल्या या कहाणीमध्ये जॅकलिन, एम्मा हार्ट या करारी, महत्त्वाकांक्षी आणि आवडण्याजोग्या काल्पनिक नायिकेचा आधुनिक अवतार वाटते. कहाणी वाचून समस्त स्त्री-वाचकांना ती आपल्यापैकीच एक असल्यासारखं वाटेल. ही एक ज्वलंत आणि प्रभावी कथा आहे. आपलं खरं मूल्य आणि क्षमता खूप उच्च आहेत, हे जाणून असणा-या आणि ती पातळी गाठण्यासाठी प्रेरणा शोधत असलेल्या स्त्रियांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मंगल स्तोत्र ठरेल.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184980868 |
No.Of.Pages
|
223 |
Shades / Types