सुधा सोनाळकर ह्यांना कष्टमय जिणे जगावे लागले; परंतु तशा परिस्थितीतही त्या सतत हसतमुख राहिल्या, स्वतःच्या अंगचे गुणविशेष प्रकट करत राहिल्या. जगण्याच्या ओघात त्यांच्याकडून झालेले काही लेखन येथे संग्रहित केले आहे. त्यात जुन्या, हरपल्या जगाची मोहिनी आणि त्यातील जीवनमूल्ये आढळतील.