Product Details
या कवितासंग्रहामधील कविता सर्वच भटक्या-विमुक्तांचा निळा मोर्चा घेऊन मराठी कवितेत येत आहेत. या मोर्च्यात वासुदेव, कुडमुड्या जोशी, बंजारा आणि त्याचा तांडा, कोल्हाटीण-मुरळी-जोगतीण, भावीण, बोहारीण, नाथपंथी, पांगुळ, कंजार,वडार, गोंदून देणारी बाई असे सर्वच भटक्या विमुक्तांधील स्त्री-पुरुष इथे आहेत.या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य हे आहे, की या सर्वांचा इतिहासातील संघर्ष, भटक्या-विमुक्तांच्या जीवनातील स्थित्यंतरे ही कविता आपल्यापुढे मांडते. या सर्वांचा यातनांनी भरलेला वर्तानकाळही आहे आणि या सर्वांच्या उज्ज्वल भवितव्याची निळी पहाटही आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
46 |
Shades / Types